शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.

नाते कवितेचे... : ना. धों. महानोर

नारायण सुर्वे यांच्या निधनामुळे साठोत्तरी मराठी कवितेतील एक धगधगते पर्व अस्तास गेले आहे. चार दशकांहून अधिक काळ त्यांच्याशी ऋ णानुबंध असलेले ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी जागवलेल्या या आठवणी...
.................

मराठी नवकवितेच्या काळात नारायण सुवेर् यांच्या कवितेने मराठी रसिकांना चांगल्या अर्थाने हादरा दिला. अमर शेख यांच्या डफावर नारायण सुवेर्ंचीही कविता मी विद्याथीर् असताना शेंदुणीर्त ऐकली. त्यावेळी गरिबांची, दु:खितांची आणि सामान्य माणसांची भाषा असलेल्या या कवीशी माझे प्रेम जडले. १९६०च्या काळात फारशी वाङ्मयीन नियतकालिके नव्हती. प्रकाशने नव्हती, त्यावेळी हैदराबाद साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा कविता हा संग्रह काढण्याचे ठरविले. १९६४मध्ये मी चंदकांत पाटील यांच्याबरोबर मुंबईत गेलो. त्यावेळी प्रथम नारायण सुवेर् यांची भेट झाली. कामगारांच्या चाळीतलं त्यांचं छोटसं घर, छोटासा संसार पाहून कळवळा वाटला. 'माझे विद्यापीठ' ही त्यांची मोठी कविता त्यावेळी प्रसिद्घ झाली. कामगार चळवळीतील तुटलेला, फाटलेला माणूस त्यांच्या कवितेमध्ये आला. शेवटपर्यंत या सामान्य माणसांशी नाते, आपल्या कवितेचा पोत त्यांनी कायम ठेवला.

सुवेर् यांच्या अगोदर डावा, साम्यवादी विचार कवितेतून आला. पण एवढा लोकप्रिय झाला नव्हता. नारायण सुवेर् यांनी संत कवीच्या भाषेत साम्यवादी विचाराची कविता लिहिली. आपला क्रांतिकारी विचार त्यांनी तुकाराम आणि सावतामाळी यांच्याप्रमाणे सोप्या भाषेत प्रभावीपणे मांडला. जीवनभर अनुभवलेले दु:ख आणि आसपासची परिस्थिती त्यांनी 'ना घर होते ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती' अशा धाटणीच्या कवितांमधून मांडली आणि ती मराठी मनाला भिडली.

माझ्या आणि त्यांच्या कवितेचे नाते एकच. मी खेड्यातून आल्यामुळे निसर्गातील कुरूपाचे सुरूप, शुद्घ स्वरूपाचे मांडण्याचा प्रयत्न करीत होतो तर गिरणी कामगारांचे दु:ख सुवेर् यांनी त्यांच्या कवितेमध्ये मांडले. खेड्यातील माणूस आणि गिरणी कामगार यांच्या दु:खाची नाळ एकच असल्यामुळे आमच्या दोघांचे आपसुकच नाते जडले.

१९६८मध्ये ग्रेस, नारायण सुवेर् आणि मी यांचे काव्यवाचन पॉप्युलर प्रकाशनने 'रानातल्या कविते'ला पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने ठेवले होते. त्यावेळी प्रत्येकाने दहा-पंधरा कविता पेश केल्या. त्यावेळी प्रथम काव्यवाचनाची सुवेर् यांची ताकद ठसठशीतपणे पुढे आली. त्यानंतर आम्ही दोघांनी किमान पन्नास-साठ ठिकाणी एकत्र काव्यवाचन केले. दोघांची कविता स्वतंत्र होती. पण ती होती सर्वसामान्यांसाठी. नारायण सुवेर् यांनी आपल्या कवितेत विदोह अत्यंत साधेपणाने, संयतपणे मांडला. साठोत्तरी कवितेचा काळ हा मोठा संुदर काळ होता. त्यावेळी अनेक श्रेष्ठ कविमित्रांचे वाद संवाद व्हायचे आणि त्या सर्वांचे म्होरके म्हणून नारायण सुवेर् यांनी काम पाहिले. कवी-कवीमध्ये त्यावेळी संवाद घडायचा, चर्चा व्हायच्या. एखाद्या कवितेमध्ये काही चूक असेल, बटबटीत असेल तर सुवेर् स्पष्टपणे सांगायचे. साहित्यामधील विचार आदानप्रदान करण्याचे निर्मळ असे वातावरण त्यावेळी होते, ते आता अभावानेच दिसते.

नारायण सुवेर् आणि माझी मैत्री प्रदीर्घ काळ होती. सुख-दु:खात होती. आयुष्यातील बॅडपॅचमध्ये आम्ही एकत्र राहिलो. सुवेर् यांच्यासारख्या ज्येष्ठ कवीला कबीर जनस्थानापासून अनेक पुरस्कार मिळाले. पण अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होता आले नाही. दोन वेळा ते अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पडले याची माझ्या मनाला बोच होती. एका प्रतिभावंत कवीला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळत नाही याचे वाईट वाटत होते. दरम्यान, मी साहित्य महामंडळाचा अध्यक्ष असताना परभणीच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांना निवडून आणले आणि ते अध्यक्ष झाल्याचा मनाला मनापासून आनंद झाला. त्यांचा पहिला मोठा सत्कार संमेलनाच्या अगोदर जळगावमध्ये आम्ही घडवून आणला. या भरगच्च कार्यक्रमात सुवेर् यांनी अनेक नवीन गोष्टींची वेगळ्या पद्घतीने मांडणी केली. गेल्या काही वर्षांत दुदैर्वाने ते सतत आजारी होते. त्यांचे फोनवर अधूनमधून बोलणे व्हायचे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपली स्वत:ची कविता, तिचे मूल्य, कवितेचा पोत आणि दर्जा सांभाळला. सुवेर् आणि माझे काव्यवाचनाचे अनेक कार्यक्रम झाले. या मैफिलीतून सुवेर् निघून गेल्याचे मनापासून वाईट वाटते.

(म.टा.वरून साभार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

|| एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला ||

`डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता’ या ब्लॉगवर वाचा : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार प्राप्त दीर्घ कविता : ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला’ दीर्घ कविता येथे वाचा
गझलकार